Saturday, 25 July 2015

डाळिंब लागवड


डाळिंब लागवडीसाठी हवामान :- उष्ण दिर्घ उन्हाळा कोरडी हवा साधारण हिवाळा
डाळिंब लागवडीसाठी जमिन :- हलकि ते मध्यम प्रकारची जमिन व चुनखडी
कमी प्रमाणात उत्तम निच-याची , हलक्या ते
मध्यम प्रतिची जमिन
लागवडीनंतर फळ घेणेकरिता थांबणेचा कालावधी २ वर्ष , रोपाची लागवड करताना दोन रांगामध्ये १२ फुट व दोन रांगातील दोन झाडांमध्ये १० फुट
अंतर पिके :- झेंडु , चवळी इ. कमी उंचीने वाढणारी पिके
जाती:-
) गणेश – फळ आकाराने मध्यम
) जी १३७ – दाणे मऊ रंग किंचित गडद
) मृदुला ( गणेश x बुल--शाह रेड संकरित महात्मा फुले कृषी विद्यापीठ) – फळ आकाराने मध्यम , फळाचा रंग व दाण्याचा रंग गडद लाल ,फळ ३०० ते ३५० ग्रॅम
) आरक्ता – आकर्षक दाणे, साल चमकदार ,गडद लाल रंग
) भगवा – बाजारपेठेसाठी उपयुक्त दर , फळे १८० ते १९० दिवसांत परिपक्व होतात
) खुले आरक्ता - गणेश x बुल--शाह रेड संकरित महात्मा फुले कृषी विद्यापीठ
जमिन व इतर बाबी :-
) माती व देठ परिक्षण करुन खतमात्रांचे नियोजन करावे, एकात्मिक खते व्यवस्थापन करावे
लागवड :- जमिनीची चांगली नांगरण करुन प्लॉट सपाटकरावा प्रतिरोपाकरिता 2x2x2( लांबी , रुंदी, खोली )खड्डा करावा त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंड , ट्रायकोडर्मा ( बुरशी ) टाकणे . रोप लावलेवर त्यावरती तंबाखु पावडर डस्टींग करावी.बुरशी जन्य रोगांकरिता बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईट व हुमणी किंवा वाळवी करिता क्लोरोपायरीफॉस पाण्यात मिक्स करुन मुळांवर ओतावे. व पावसाळी हवामान असलेस बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईट बुरशी नाशक फवारावे .
खतांचा वापर :-
. क्र.
वर्ष (वय)
शेणखताचे प्रमाण
शेरा
१० किलो
पहिल्या पाण्याच्या वेळेस शेणखत द्यावे शेणखत कुजलेले असावे व वाळवी येवु नये याकरिता खत वापर ल्यावर क्लोरोपायरीफॉस पाण्यात मिक्स करुन मुळांवर ओतावे
२० किलो
३० किलो
४० किलो
< जास्त
५० किलो
बहाराची पहिली मात्रा
बहर
लेंडी खत
कोंबडी खत
निंबोळी पेंड
रा. खत सिंगल सुपर कॉसटेक

१५ किलो
१० किलो
अर्धा किलो
अर्धा किलो

२० किलो
१५ किलो
१ किलो
७५० ग्रॅम

२५ किलो
२० किलो
दीड किलो
१ किलो


. क्र.
अवस्था
पहिला बहर
दुसरा बहर
तिसरा बहर




N
P2o5
K2O
N
P2o5
K2O
N
P2o5
K2O

पहिले पाणी देणेपुर्वी
५०
१५०
२५
७५
२००
५०
१००
२५०
५०

फळ धरणा
७५
१००
२५
१२५
१५०
५०
१५०
२००
७५

लिंबु आकाराचे फळ
१००
१५०

१५०
२००

२००
२५०


पेरु आकाराचे फळ
५०
२००
५०
१००
२५०
१००
१५०
३००
१५०

रंग येण्याची अवस्था
७५
५०
७५
१५०
१००
१५०
२००
१५०
२००

गोडी व वजन वाढ
७५

१२५
१५०

२००
२००

२५०


वरिल सर्व खते ग्रॅम मध्ये असुन युरिया खत देताना नत्र ( N ) मिळतो युरिया मध्ये ४६ % नत्र असते. म्हणुन ५० ग्रॅम नत्र देताना २३०० ग्रॅम युरिया देणे . सिंगर सुपर फ़ॉसफ़ेट मध्ये स्फुरद ( P2O5) मध्ये १६ते १८% स्फुरद असतो.म्हणजे १०० ग्रॅम स्फुरद देताना १६०० ग्रॅम सिंगल सुपर फ़ॉसफ़ेट वापरावे व म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये पालांश ( k2o ) घटक असुन मध्ये ६०% याप्रमाणे १५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे .शक्यतो सर्व खते सरळ दिलेस लवकरजास्त फायदा होतो .
रोपांची निगा :- दर १५ दिवसांनी
. क्र.
दिवस
खताचे नाव व प्रमाण

१५दिवसांनी १ वेळा
युरिया १० ग्रॅम
सिंगल सुपर फॉसफेट १० ग्रॅम
म्युरेट ऑफ पोटॅश १० ग्रॅम
३ महिन्यातुन १ वेळा ५ किलो कंपोस्ट अर्धा किलो निंबोळी पेंड प्रति झाड देणे . दर सहा महिन्यांनी २५ ग्रॅम सुश्म अन्न द्रव्य( ZN,MN,BO,FE) . दुय्यम अन्न द्रव्य( CA,MG,S) . वापरावे .पावसात हिरवळीची खते पेरुन फुलावर येण्या आधी जमिनीत गाडावीत.
0 ह्युमिक अ‍ॅसिड मुळांची वाढ करणेस दर २० दिवसांनी मुळांजवळ ओतावे.


संजीवकांचा वापर
. क्र.
संजीवक
घटक
कालावधी
प्रमाण
पीक अवस्था

वाढ रोधक
इथे फॅन
ताण बसण्याकरिता
१०० ली. पाण्यात ५०
मिली
ताण

ऑक्झिन्स
अल्फानॅफथॅलिक अ‍ॅसॅटिक अ‍ॅसिड
पाणी दिलेवर दीड महिन्यांनी
१०० ली. पाण्यात २५
मिली
फुलोरा

जीबरेलिक अ‍ॅसिड
GA3
पाणी लावल्यानंतर अडीच महिन्यांनी
१०० ली. पाण्यात ४ ग्रॅम


लिंबु आकाराची फळे

सायटोकायनिस्न
6 BA
पाणी लावल्यानंतर साडेचार महिन्यांनी
१०० ली. पाण्यात १०० मिली


पेरु आकाराची फळे

वाढ नियंत्रक
क्लोरोमॅक्वेट क्लोराईट
पाणी लावल्यानंतर सहा महिन्यांनी
१०० ली. पाण्यात १५० मिली


फळ पक्व अवस्था
सुचना –वरिल घटकांचा वापर करताना दुकानदाराकडुन योग्य माहिती घेवुन औषढांचे प्रमाण तयार करावे व पाणी स्वच्छ वापरावे पाण्याचा सामु योग्य राहण्याकरिता अंदाजे ५ ते ६ लिंबे पाण्यात पिळावीत (बी विरहीत ) किंवा सायट्रिक अ‍ॅसिड वापरावे व PH पेपरने योग्य चाचणी घ्यावी
) औषध फवारणी स्वतंत्र करावी सदर औषधे पौर्णिमा कालावधी दरम्यान फवारलेस फायदा होतो
पालवीची वाढ रोखणे आणि कार्यक्षमता वढविणे


संजीवक
फवारण्याचा हेतु
१ डाळिंब फळ लिंबु आकाराचे असताना पालवी आल्यास
सी सी सी ( वाढ नियंत्रक )
फाजील वाढ रोखणे
२ पहिल्या फवारणीनंतर७ ते १० दिवसांनी
सुक्ष्म अन्न द्रव्ययुक्त खत व NPK graed water soluble ( 0-52-34 )
पालवी परिपक्व होणे


३ दुस-या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी
सुक्ष्म अन्न द्रव्ययुक्त खत व अ‍ॅमिनो अ‍ॅसिड
पालवीची कार्यक्षमता वाढवावी


बहर:-
) मृग बहर – पावसाळी कालावधी
) हस्त बहर – सप्टेंबर , ऑक्टोंबर
) आंबे बहर – आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळिंब बहराला आंबे बहर म्हणतात.
कोकणामध्ये डाळिंब लागवड करताना सप्टेंबर पुढील कालावधी निवडणे योग्य ठरेल
) काळजी- बहर धरण्याची तारिख निश्चित करणे , छाटणी आधी खते ( कंपोस्ट स्फुरद विरघळवणारे जीवाणु ट्रायकोड्रामा) मागवुन
छाटणी-
) पोट छाटणी – झाडाच्या आतील भागात फळ येण्यासाठी केलेली छाटणी होय. झाडाच्या आतील भागात फळ देणा-या काड्या ठेवण्यात येतात त्यामुळे फळ सावलीत तयार होते
) पंजा छाटणी ‌ - हाताच्या पंजाप्रमाणे छाटणी केली जाते या छाटणीत झाडाच्या पोटातील म्हणजेच आतील फांद्याचे जाळ काढुन झाड पोकळ करण्यात येते त्यामुळे प्रत्येक फांदीला चांगला सुर्यप्रकाश मिळतो